आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:राष्ट्रवादी काँग्रेसची प्रारूप प्रभाग रचनेवर हरकत ; निवडणुकीच्या नियमांना डावलल्याचा आरोप

मेहकर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाने दिलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नियमांना डावलून करण्यात आली असल्याची हरकत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्ता पाटील घनवट, मानव विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदवली आहे. मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यावर हरकती घेण्यासाठी ८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीधर ठाकरे,तालुकाध्यक्ष दत्ता पाटील घनवट,शहराध्यक्ष निसार अन्सारी, मानव विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी तहसीलदार डॉ. संजय गरकल यांच्याकडे हरकती नुसार प्रभाग रचनेची निर्मिती व्हावी, त्यामध्ये नियम, अटी, शर्तीची पूर्तता करण्यात यावी तसेच मार्गदर्शन कलमांना स्थान देण्यात यावे अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, प्रारूप प्रभाग रचना करताना सुरवात उत्तर दिशेकडून करावी असे असताना पश्चिमेकडून सुरु करण्यात आली. तर गट ६७ हिवरा खुर्द हा नकाशानुसार पश्चिमेस आहे. त्यामुळे मुळातच प्रभाग रचना चूक झाल्याचे वाटते, ती पुनर्रचना करण्याची गरज आहे. तसेच अंत्री देशमुख गट ४१ मध्ये बोरी, मालखेड ही गावे उकळी गण ४० मध्ये समाविष्ट करणे दळणवळणाच्या अनुशंगाने सोयीस्कर ठरेल. तरी या हरकती आणि सूचनांचा विचार करावा आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करूनच निवडणूक प्रभाग आणि गणाची फेररचना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...