आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसची शरद युवा संवाद यात्रा:2024 मध्ये राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होणार : आ. नाईक

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०१४ मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार असून त्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी युवकांनी आतापासून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार इंद्रनील नाईक यांनी केले . उमरखेड येथे दि. ४ सप्टेंबरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक श्रीराम मंगल कार्यालय येथे शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब यांची तर पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, विधानसभा अध्यक्ष भीमराव पाटील चंद्रवंशी, माजी नगराध्यक्ष राजू भैया जयस्वाल, वि. ना. कदम, साजिद जागीरदार, भास्कर पंडागळे, निखिल ठाकरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष त्यांनी आपल्या भाषणातून भाजपच्या मोदी राजवर कडाडून प्रहार केला व बोलताना मोदी सरकार अग्निपथ योजनेअंतर्गत युवकांची पिढी बरबाद करण्याचे धोरण भाजपा सरकारने आखले असल्याचे सांगण्यात आले. युवकांना पुढच्या आव्हानांना तयार राहण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन बबलू जाधव तर आभार गुणवंत सूर्यवंशी यांनी केले. यासाठी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे मिथिलेश जयस्वाल, प्रकाश राठोड, जाकीर राज, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष सूर्यवंशी , शंकर जाधव सह अनेक पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...