आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:जिल्ह्यातील विधानसभेच्या ३ जागा ‘राष्ट्रवादी’ लढणार ; जिल्हा परिषदेलाही निवडून आणणार 20 जागा

बुलडाणा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीसोबत निवडणुका झाल्यास जिल्ह्यातील तीन विधानसभेच्या जागांवर निवडणुका लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २० जागा जिंकणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा १० जून रोजी वर्धापन दिन होता. त्यानिमित्त येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, सुमित सरदार, महिला जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे, डी. एस. लहाने, अनिल बावस्कर, अतुल लोखंडे, बोरकर आदींची उपस्थिती होती. या वेळी ॲड. काझी यांनी कटिबद्धता राष्ट्रवादीची अडीच वर्ष जनसेवेची अशी एक पुस्तिका केलेल्या कामांची काढली आहे. यामध्ये अर्थसंकल्पातील तरतुदी, जलसंपदा व लाभक्षेत्र यासह इतर विविध योजनांवर केलेली कामे व सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती दिली. विविध कामांवर प्रकाश टाकतानाच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यावरही प्रकाश टाकला. जिल्ह्यात राष्ट्रवादी फक्त एका सिंदखेडराजापुरती मर्यादित नसून मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जामोद आदी भागांचे दाखलेही त्यांनी दिले. या वेळी विधानसभा लढवण्याबाबत म्हणाले, की मेहकर, जळगाव जामोद व सिंदखेडराजा हे तीन मतदारसंघ महाविकास आघाडी सोबतच्या निवडणुकीत आपण मागून घेणार आहोत. परंतु, महाविकास आघाडीसोबत सत्तेत असलेले मेहकर, मलकापूर हे वगळून खामगाव विधानसभा मतदारसंघ मागण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी पक्षाला एक चारचाकी वाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुमित सरदार यांनी दिल्याची घोषणाही त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...