आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:जळगाव जामोद येथे कडुनिंबाच्या‎ झाडाची चोरी; प्रशासन मात्र अनभिज्ञ‎

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जामोद‎ येथील दुर्गा चौकातील नगर‎ परिषदेच्या अखत्यारीतील‎ कडूनिंबाचे झाड अज्ञात व्यक्तीने ‎ तोडून नेले. ही घटना गुरुवारी ‎उघडकीस आली. परंतु याबाबत‎ नगर पालिका प्रशासन व पोलिस ‎अनभिज्ञ आहे. या घडलेल्या ‎प्रकारामुळे अज्ञात चोरट्याने ‎नवनियुक्त ठाणेदार दिनेश झांबरे‎ यांना आव्हान दिले आहे.‎ नगर परिषदेने सहा- सात‎ वर्षापूर्वी शहरात मोठा गाजावाजा‎ करत झाडे लावा-झाडे जगवा,‎ असा नारा देत वृक्षारोपण केले. ‎वृक्षारोपण केलेली झाडे देखील‎ मोठ्या प्रमाणात जगली. परंतु नगर ‎पालिकेकडे किती झाडे लावण्यात ‎ आली.

मात्र या वृक्षाचे संगोपन व‎ निगा राखण्यासाठी नगर पालिका‎ हद्दीत राहणाऱ्या नागरिकांजवळ‎ वृक्ष कर दरवर्षी वसूल करण्यात‎ येतो, मात्र त्यापैकी किती झाडे‎ जगली, याचा हिशोब नाही.‎ दरम्यान दुर्गा चौकातील‎ न.प.कॉम्पलेक्स बांधलेच्या ९ व १०‎ क्रमांकाच्या दुकानासमोरील‎ नालीच्या काठावरील लिंबाच्या‎ झाडाच्या फांद्या अज्ञात चोरट्याने‎ १५-२० दिवसाआधी तोडून नेल्या‎ व ४ जानेवारी रोजी दरम्यान हे‎ ‎लिंबाचे झाड अज्ञात चोरट्याने‎ तोडून नेले आहे. याबाबत नगर‎ पालिका व पोलिस प्रशासन‎ अनभिज्ञ दिसून आले.‎चोरट्याने याच तात्पुरत्या पोलिस चौकीजवळून कडूनिंबाचे झाड तोडून नेले.‎

पोलिस, न.प. प्रशासनाला साधी कुणकुणही नाही‎ नगर पालिकेचे मुख्याधिकारी रजेवर असून प्रभाव शेगाव येथील‎ मुख्याधिकारी यांच्याकडे आहे. दुपार पर्यंत झाड चोरीला गेल्याची न. प.,‎ पोलिस प्रशासनाला साधी कुणकुण देखील नव्हती. वृत्त लिहेपर्यंत‎ संबंधितांकडून तक्रार देण्यात आलेली नव्हती.‎

बातम्या आणखी आहेत...