आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी नीलेश गायकवाड यांचे उपोषण; नीलेश कोंडू गायकवाड यांनी आज ११ मे पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोलवड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकाम चौकशीमध्ये दोषी असलेले कार्यकारी अभियंता बी. आर. परदेशी व तक्रार प्रलंबित असतांना उपकेंद्र ताब्यात घेणारे वैद्यकीय अधिकारी व्ही.टी. रिंढे यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी कोलवड येथील नीलेश कोंडू गायकवाड यांनी आज ११ मे पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली आहे. कोलवड येथे २०१८ मध्ये उप आरोग्य केंद्रास मंजुरी देण्यात आली होती. तर २०२० मध्ये या केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या केंद्राचे बांधकाम करीत असताना कुठल्याच प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर शाळेचे बांधकाम पाडून त्यावर ही इमारत बांधण्यात आली आहे. आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यासाठी शाळा समिती, मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली नाही.

बातम्या आणखी आहेत...