आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमदान:श्रमदानातून युवकांनी बांधले मातीबांधासह नऊ दगडी बांध

जळगाव जामोद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर, सांगली सातारा जिल्ह्यातील शंभर युवकांनी जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सालईबन येथे श्रम रंगांची उधळण केली. यावेळी कोल्हापूर येथील जि.प.चे माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या नेतृत्वात मायभू सेवा यात्रेच्या माध्यमातून हे युवक स्वखर्चाने श्रमदानाकरता याठिकाणी आले होते. दरम्यान १८ व १९ मार्च रोजी श्रमदानातून या युवकांनी २५ मीटरचा माती बांध, ९ दगडी बांध, २०० रनिंग मीटर सलग समतल चर असे एकूण ६ लक्ष रुपये किमतीचे जलसंधारणाचे काम केले.

सालईबन येथे श्रम रंगाची उधळणाकरीता पश्चिम महाराष्ट्रातील युवकासह शिवम प्रतिष्ठान घारेवाडी यांच्यासोबत अदिती अर्बन परिवार बुलडाणा, तरुणाई फाउंडेशन खामगाव व बिरसा मुंडा मंडळ वडपानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी देश प्रेमाचे नारे, स्फूर्ती गीते, भजन नृत्य अश्या उत्साही वातावरणात हा श्रम सोहळा रंगला होता. सालईबनच्या जमिनीची विश्वस्त संस्था महात्मा गांधी लोक सेवा संघाचे अध्यक्ष व सेवा ग्राम गांधी आश्रमाचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर, तरुणाई फाउंडेशनचे विश्वस्त नरेंद्र लांजेवार यांना कार्यरूपी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी इंद्रजीत देशमुख यांच्या व्याख्यानाचा उपस्थितांनी लाभ घेतला.

बातम्या आणखी आहेत...