आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन वर्षांपासून आपण सर्वजण कोरोना सारख्या रोगाशी झुंज देत आहोत. या महामारीच्या काळात आर्थिक दुर्बल,निराधार,विधवा भघिनी,अपंग अशा विविध घटकांना या काळात सामाजिक,आर्थिक, आरोग्य तसेच विविध समस्याना सामोरे जावे लागले. मात्र,शासकीय योजनेच्या माध्यमातून या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केल्या जाईल. तसेच एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
देऊळगावराजा तहसील कार्यालय येथे मंगळवार रोजी महसूल विभागाअंतर्गत राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत धनादेशाचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गजानन चेके, राजेंद्र सिरसाट, गजानन पवार, उद्धव म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत ३९ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, शासकीय योजना या सर्वसामान्य घटकांना न्याय देण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तयार करण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे. एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. सर्वसामान्य नागरिकांच्या आशीर्वादाने व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने माझा सामाजिक व राजकीय प्रवास आतापर्यंत सुखकर होत गेला असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
त्यामुळे एकही माता-भगिनी व गरजू नागरिक कुठल्याच शासकीय योजने पासून वंचित राहणार नाही असे उद्गार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. दरम्यान राजेंद्र शिरसाट, अॅड. नाझेर काझी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय गांधी निराधार समिती सदस्य रुपाली बनकर, कारभारी शेळके, जाफर सिद्दिकी, भास्कर बंगाळे, शिवाजी झोटे,राजाराम बारोटे, हरिमामा शेटे,पंढरी डोके, परमेश्वर शिंदे, गणेश पऱ्हाड, संजयराजे जाधव, रंगनाथ कोल्हे, मंदाबाई शिंगणे, तहसीलदार श्याम धनमने, नायब तहसीलदार प्रीती जाधव, विष्णू बनकर, नायब तहसीलदार कुळमेथे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.