आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलेले असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील २१३ अतिक्रमणधारकांना ३१ डिसेंबरच्या आत अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी नांदुरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी, नांदुरा पोलिस मुख्य प्रशासन अधिकारी, एस.डी.ओ., तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दिलेल्या कालावधीत शहरातील अतिक्रमणधारकांनी केलेले हे अितक्रमण न हटवल्यास या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर क कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे? नांदुरा येथील नगर परिषद हद्दीमध्ये नझुलच्या जागेवर मोठ्या प्रमाणात श्रीमंतांनी तसेच नागरिकांनी अतिक्रमण करून या जागेवर मोठ्या प्रमाणावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाने हे बांधकाम त्यांनी पाडले नाही तर बुलडोझर लावून ते पाडण्यात येणार असून येणारा खर्च त्यांच्याकडून वसूल केल्या जाणार असल्याचे आहे.
नांदुरा शहरातील अतिक्रमण पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाले असून मुख्याधिकारी, तहसीलदार, एस. डी. ओ., पोलिस प्रशासनाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे अतिक्रमण काढताना एकत्र येणार असून या सर्वांच्या सहकार्याने अतिक्रमण काढून नांदूराकरांना मोकळा श्वास मिळाला पाहिजे या दृष्टीने हे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे शहरामध्ये शासकीय जागा बळकावून अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सरकारी जागा बळकावणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.