आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटीचा काळ:आता नव्या दमाने जुने शिवसैनिक उतरले मैदानात ; घाटा खालील सर्व शिवसैनिक शिवसेनेतच’

शेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना उभी राहली दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन घाटाखालील शिवसैनिक शिंदे गटात असल्याची माहिती देण्यात आली ती दिशाभूल करणारी असून आम्ही शिवसेनेत होतो आणि शिवसेनेत राहणार,असे प्रतिपादन मा.शिवसेना उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक अविनाश दळवी यांनी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

हा काळ कसोटीचा असला तरी बाळासाहेब ठाकरे यांचे विचारावर चालणार खरा शिवसैनिक शिवसेनेतच असून शेवटपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वर निष्ठा ठेवत शिवसेनेतच राहणार आहे याप्रसंगी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित होते. तुकाराम काळपांडे, रवींद्र झाडोकार, रमेश उमाळे,अजय अहिर, दत्ता पाटील, वासुदेव तायडे, योगेश पल्हाडे, नगरसेविका पल्हाडे, गजानन हडोळे, विजय काळे जळगाव,प्रल्हाद पांडे, मंगेश गायकी, आशिष मिरगे, विशाल आखरे, रमेश चिपडे संग्रामपूर, अमोल चव्हाण, दिनेश शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, शिवा कराळे, अमोल ढोन, अरुण फाळके, मोहन लांजुळकर, शांताराम धुमाळे, गोपाल पाटील यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...