आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा खून:अवैध संबंधात अडसर; पत्नीने केला पतीचा खून

सिंदखेडराजा/ साखरखेर्डा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियकराने दिली साथ, गोरेगाव येथील घटना

अनैतिक संबंधांस अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून दोरीने गळा आवळून पलंगावरच खून केल्याची घटना सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे काल मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला गजाआड केले आहे.

येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या गोरेगाव येथील ३६ वर्षीय विवाहितेचे गावातीलच एजाज खान याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाची कुणकुण तिच्या पतीला लागली होती. दरम्यान, या प्रेम प्रकरणाचा गावात गवगवा झाल्याने एजाजने माफी मागितली होती. त्यानंतर या प्रेम प्रकरणावर पडदा पडला होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ती महिला आणि तिचा पती हे दोघे कामासाठी अहमदनगर येथे गेले होते. १४ मार्च रोजी शेतीच्या खरेदीसाठी ते दोघे गोरेगाव येथे परत आले. ती महिला आणि एजाज यांच्या प्रेमाला पुन्हा बहर आला. १५ मार्च रोजी त्या महिलेच्या मुलीचा दहावीचा पेपर असल्याने तिचा नवरा मुलीला सोडण्यासाठी साखरखेर्डा येथे आला होता. त्यानंतर तो तिला घेऊन घरी गेला. या वेळी ती महिला आणि तिच्या नवऱ्याचे शाब्दिक भांडण झाले. त्यावेळी तेथे असलेल्या त्या महिलेचा प्रियकर एजाज या दोघांनी मिळून घरातील पलंगावर त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. महिलेचा पती पलंगावर निपचित पडला असता त्याचवेळी त्याची आई तिथे गेली. काहीच बोलत नसल्याने त्यांनी त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेची तक्रार मृताची आईने साखरखेर्डा पोलिसांत केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी भेट दिली. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...