आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजाआड:अनैतिक संबंधात अडथळा; पतीचा खून ; पोलिसांनी आरोपींना केले गजाआड

बिबी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनैतीक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकर व मुलाच्या मदतीने दोरीने गळा आवळत डोक्यात दगड घालून खून केला. तसेच या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून आरोपींनी मृतदेह भुमराळा शिवारातील एका शेतातील विहिरीत फेकून दिला. ही थरारक घटना ९ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींना आज ११ जून रोजी जेरबंद केले आहे. येथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वझर आघाव येथील आरोपी ज्ञानदेव रामप्रसाद आघाव (३४) व संगीता रामदास सरकटे (४२) यांच्यात अनैतिक संबध होते. याबाबत कळताच पती रामदास त्र्यंबक सरकटे हा संगीता व मुलगा तेजस यांना त्रास देत होता. याच कारणावरून पती पत्नीमध्ये भांडणे सुध्दा होत होती. त्यामुळे पतीचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपी प्रियकर ज्ञानदेव रामप्रसाद आघाव अनैतिक संबंधात अडथळा; पतीचा खून संगीता रामदास सरकटे व विधी संघर्ष ग्रस्त बालक तेजस रामदास सरकटे यांनी संगनमत करून ९ जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास रामदास सरकटे याचा दोरीने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर मृतदेह भुमराळा शिवारातील जनाबाई चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणाचा अवघ्या काही तासात तपास करून आरोपींना आज शनिवारी जेरबंद केले आहे. ही कारवाई ठाणेदार एल. डी. तावरे, पोलीस उपनिरिक्षक गोपाल राठोड पोहेकॉ, कलीम देशमुख, नापोकॉ अरूण सानप, अर्जन सांगळे, नितीन मापारी यांनी केली आहे. अवघ्या काही तासात या खून प्रकरणाचा छडा लावल्यामुळे स्थानिक पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...