आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रहार जनशक्तीच्यावतीने वीज अभियंत्यास निवेदन:विद्युत रोहित्रामुळे वाहतुकीस अडथळा; अपघाताची शक्यता

मलकापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील माता महाकाली रोडवर असलेली विद्युत रोहित्रामुळे या परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदरचे रोहित्रामुळे एखाद्या वेळी अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने हे रोहित्र इतरत्र हलवण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष अपंग क्रांतीच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंता वीज वितरण यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, माता महाकाली रोडवर वीज वितरण कंपनीची विद्युत रोहित्र असून हे रोहित्र परिसरातील वाहतुकीला अडचण निर्माण करत आहे. माता महाकाली रोड हा रहदारीचा रस्ता असून वीज वितरणाची विभागाने हे रोहित्र अन्य ठिकाणी हलवावे अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरचे रोहित्र त्या ठिकाणावरून हटवून इतरत्र स्थलांतरीत करण्यात यावे जेणे करून वाहतुकीस निर्माण होणारी अडचण दूर होईल. अशी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष अपंग क्रांतीच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्यासह प्रहार अपंग क्रांती महिला तालुका प्रमुख शुभांगी डवले, शहर प्रमुख शालीकराम पाटील, तालुका प्रमुख अजित पुंष्ठदे, शहर उपप्रमुख नितीन खंडारे, अपंग क्रांती तालुका प्रमुख राहुल तायडे, योगेश बावस्कर, बळीराम बावस्कार, राहुल चित्ते, किशोर चित्ते, राजेंद्र तांदुळकर, नटराज मिल्क कॉर्नर, अनिल श्रीनाथ, दीपक चित्ते, भगवान वखरे, पांडुरंग भोकरे, सचिन नारखेडे, रवींद्र गिरी, शुभम जाधव, सागर पाटील, अशोक गाढवे यांच्यासह प्रहार जनशक्तीचे पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...