आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनशे वर्षांची परंपरा:मानाच्या गणपतीला नारळाचा फुलोरा अर्पण

देऊळगावराजा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री बालाजी फरस परिसरात श्री सावजी गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेशाची स्थापना गेल्या तीनशे वर्षांपासून केली जाते. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापनेची परंपरा या मंडळाने आजतागायत जपली आहे. देऊळगावराजातील मानाचा गणपती म्हणून श्री सावजी गणेश मंडळाची ओळख असून ५ सप्टेंबर रोजी माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी श्रींचे दर्शन घेत नारळाचा फुलोरा अर्पण केला.

श्री सावजी गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती बनवण्याचा मुहूर्त गोकुळाष्टमीला केला जातो. सर्वप्रथम पारंपरिक पद्धतीने ठरलेल्या कुंभाराकडून माती घेतली जाते. त्यानंतर सुरेश विष्णू सावजी व त्यांचे सहकारी मूर्ती तयार करतात व त्या मूर्तीची स्थापना केली जाते. ही परंपरा मागील तीनशे वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. श्री बालाजी महाराजांची यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी, अशी प्रार्थना या श्री गणेशाला भक्तांकडून केली जाते. दरम्यान, आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मानाच्या गणपतीचे दर्शन घेऊन नारळांचा फुलोरा श्री गणेशाच्या चरणी अर्पण केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश सवडे, माजी नगराध्यक्ष कविश जिंतूरकर, मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. अर्पित मिनासे, विष्णू रामाने, अशोक पाटील, अरविंद खांडेभराड यांच्यासह गणेश भक्त उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...