आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गटात न गेल्याने शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख या पदाकडे लक्ष लागुन होते. बुलडाणा जिल्ह्याचे प्रमुख म्हणुन सागवन या गावचे माजी सरपंच ओमसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. मात्र अधिकृत असे पत्र अद्याप मिळाले नाही. या बाबत ओमसिंग राजपुत यांनी आपली नियुक्ती झाल्याचे स्पष्टीकरण दिले असून या बाबत आ. संजय गायकवाड यांनी सुध्दा आपल्याला माहिती दिली आहे.

चार दिवसांपूर्वी या नियुक्त्या झाल्या असून कार्यकारिणीची निवडीचे पत्र लवकरच प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या निवडीचा जल्लोष मात्र सागवन ग्रामपंचायती अंतर्गत काही सदस्य व काही नेत्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...