आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस साजरा:राष्ट्रवादी ओबीसी सेल तर्फे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा वाढदिवस साजरा

चिखली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आधारवड, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा आधार सेनेचे अध्यक्ष सुभाष देव्हडे यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबवण्यात आले. स्थानिक गजानन महाराज मंदिरामध्ये गजानन महाराजांची यथासांग पूजा अर्चना करण्यात आली. यावेळी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील होते. तर प्रमुख उपस्थितीत रा. काँ.चे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, शहर उपाध्यक्ष प्रमोद चिंचोले, दक्षता समितीचे जिल्हा सदस्य विनोद पवार, महिला तालुकाध्यक्ष रेखा महाजन, महिला शहराध्यक्ष बानू जैवाळ, सेवादल प्रदेश प्रतिनिधी रत्ना सोळंकी,आशा कस्तुरे, प्रिया भारती, गिते,कल्पना केजकर, विजया भारती, रत्नमाला सोळंकी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक सुभाष देव्हडे यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये बोलतांना डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नेतृत्व बावनकशी सोन असल्याचे सांगून त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे स्पष्ट केले.

तसेच ते मंत्री असूनही आचरणातील साधेपणा, कार्यकर्त्यांविषयी असलेली तळमळ, कोरोनाकाळामध्ये दिवसरात्र स्वत:च्या प्रकृतीची काळजी न करता जनतेच्या सेवेसाठी घेतलेले कष्ट व समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसुविधा पोहोचवण्यासाठी केलेली धडपड, स्वत: दोन वेळेस कोरोना महामारीने ग्रासल्यानंतरही त्याची तमा न बाळगता जनसेवेला स्वत:ला वाहून घेतले असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून प्रमोद पाटील यांनी मंत्री डॉ. शिंगणे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर कोरोना काळामध्ये घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यामुळे त्या परिवाराला जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. यासह ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. अशाच स्वरुपाचा कार्यक्रम शहरातील सिध्द सायन्स चौक, शिवसंभाजी नगर येथे पार पडला.

बातम्या आणखी आहेत...