आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक‎ कार्यक्रम:तुकाराम महाराज बीजनिमित्त‎ आजपासून अखंड हरिनाम सप्ताह‎

बिबी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परिसरातील चोरपांग्रा (वीरपांग्रा)‎ येथे संत तुकाराम महाराज बीज‎ निमित्त गुरुवार, दि. २ मार्चपासून‎ अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्रीराम‎ कथा आणि तुकाराम महाराज गाथा‎ पारायण सोहळ्याचे आयोजन‎ करण्यात आले आहे.‎ गुरुवारी तुकाराम महाराज मंदिर‎ परिसरात संतांच्या हस्ते धर्म मंडप,‎ व्यासपीठ आणि कलशाचे पूजन‎ करण्यात येणार आहे. दि. ९ मार्चपर्यंत‎ दररोज धार्मिक व सांस्कृतिक‎ कार्यक्रम होणार आहेत. दररोज‎ सकाळी ४ ते ६ या वेळेत काकडा‎ भजन, ६ ते ८ विष्णू सहस्त्रनाम, ८.३०‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ते १२.३० तुकाराम महाराज गाथा‎ पारायण, दुपारी १ ते ४ श्रीराम कथा,‎ सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते‎ ११ हरिकिर्तन होणार आहे.

हरिभक्त‎ पारायण पांडुरंग महाराज डहाळके,‎ उगलमुगले महाराज, सत्यभामाताई‎ या सोहळ्यात गाथा वाचन करणार‎ आहेत.‎ सोहळ्यात गुरुवारी प्रेमचंद‎ महाराजांचे कीर्तन होणार आहे. दि. ३‎ मार्चला अनिरुद्ध महाराज, ४ मार्च‎ अशोक इलग, ५ मार्च भागवत‎ महाराज, ६ मार्च तुकाराम कडपे‎ शास्त्री, ७ मार्च गंगाधर मुंढे, ८ मार्च‎ भास्करबाबा रसाळ, तर ९ मार्च रोजी‎ सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत‎ केशवबुवा महाराज बुधवंत यांचे‎ काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १‎ वाजता महाप्रसाद वितरण होणार‎ आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ‎ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...