आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुक्त पत्रकार तथा साहित्यिक, ग्रंथपाल स्व. नरेंद्र लांजेवार यांच्या दहाव्या मासिक स्मृतिदिनानिमित्त सुप्रसिद्ध कवी, लेखक प्रसाद कुळकर्णी यांच्या आनंदयात्रा या कार्यक्रमाचे आयोजन बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये करण्यात आले होते. मराठी शुभेच्छा पत्रांचे सौदागर, ख्यातनाम कवी प्रसाद कुलकर्णी यांनी आनंदयात्रा या कार्यक्रमातून बुलडाणेकरांना हसवत तर कधी अंतर्मुख करत जगण्याचा आनंद क्षणोक्षणी उपभोगण्याचे आवाहन केले. प्रसाद कुळकर्णी यांनी त्यांची कविता..
प्रेम म्हणजे काय रे.. दुधावरची साय रे... आपुलकीची उब मिळताच.. सहज उतू जाय रे... म्हणून रसिकांची मने जिंकली.
याप्रसंगी प्रसाद कुळकर्णी यांच्यासोबत बुलडाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर,डॉ. गणेश गायकवाड यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. गणेश गायकवाड म्हणाले की, काही माणसे या जगातून गेली तरी ती आपल्या जीवनातून कधीच जात नसतात. नरेंद्र लांजेवारांचे व्यक्तिमत्व असेच होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन सतत करत राहणार आहे. याप्रसंगी करताना विचार व्यक्त डॉ.सुकेश झंवर म्हणाले की, आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही आनंद हा खूप मोठा विषय आहे. यानंतर प्रसाद कुळकर्णी यांच्याशी निवेदक चंद्रशेखर जोशी यांनी संवाद साधत आनंदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
जगण्याचा आनंद घ्यायचा असेल तर दुःख विसरावं लागेल आणि हे दुःख विसरणं स्वतःच्याच मर्जीतले आहे.आनंद हा उपभोगता येणे हे देण्यावर अवलंबून असतं. त्यासाठी द्वेष, मत्सर, अहंकाराची जळमट दूर सारली की माणूस आनंद यात्री म्हणून जगू शकतो. यावेळी सर्वद फाउंडेशन मुंबईच्या वतीने उत्कृष्ट कवी म्हणुन पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रसाद कुळकर्णी यांनी कवी सुधाकर मानवतकर यांचा सत्कार केला.
तसेच डॉ.शोण चिंचोले यांची बुलडाण्यातील सार्वजनिक शिवजयंती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी तर आभार प्रदर्शन रविकिरण टाकळकर यांनी केले. आनंदयात्रेला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन बुलडाणा अर्बन परिवार, प्रगती वाचनालय, सहर ये गझल अकादमीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.