आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधामणगाव बढे पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या नळकुंड उबाळखेड परिसरात गावठी दारूची निर्मिती करण्यात येत असलेल्या माहितीवरून धामणगाव बढे पोलिसांनी गावठी दारु अड्ड्यावर धाड टाकुन १३ हजार ५०० रुपयाच्या दारूसह एका आरोपीस अटक केली. ही कारवाई आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली आहे. मोताळा तालुक्यातील उबाळखेड येथील लहू साहेबराव शिकारे वय २२ हा नळकुंड उबाळखेड शिवारात गावठी दारू काढत असल्याची माहिती धामणगाव बढे पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी धाड टाकून आरोपीस दारूसह पकडले. यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून साडे सात हजार रुपये किमतीचा तीनशे लिटर मोह सडवा व सहा हजार रुपये किंमतीची साठ लिटर दारू असा एकूण १३ हजार ५०० रुपयाचा माल जप्त केला आहे. ही कारवाई ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गजानन पाटील, सुरेश सोनवणे, चंदनसे मेजर, पोलिस कर्मचारी सूरज रोकडे, संजय जाधव यांनी केली आहे. प्रकरणी पोहेका गजानन पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.