आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:पहुरजीरा येथील व्यक्तीची दीड लाखाने ऑनलाइन फसवणूक; जलंब पोलिसांत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल वर ऑनलाइन महिती टाकताना समोरच्या मोबाइल धारकाने मोबाइलवर एक लिंक पाठवून त्यामधे ॲपचा युजर नेम, पासवर्ड, खाते क्रमांक, पॅन कार्ड व आधार कार्डची माहिती घेवून दीड लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना शेगाव तालुक्यातील पहुरजीरा येथे आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी जलंब पोलिसांत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथील बाबुराव रामभाऊ तायडे वय ३५ यांनी दिलेल्या तक्रारी नुसार ते त्यांच्या मोबाइलवर एसबीआय योनोचे ॲप वापरून व्यवहार करत असतात. ३१ मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाइल वर एसबीआय योनो ॲप लॉगीन होत नव्हते. त्याच वेळी या ॲपचा पासवर्ड टाकत असताना त्याचे खालील बाजूस एक लिंक आली होती. मोबाइल क्रमांक ९२३४४५२५५८ च्या धारकाने बाबुराव तायडे यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून त्यामध्ये त्यांची माहिती घेतली व बँक खात्यातून १ लाख ५३ हजार ९५१ रूपये काढले.

नागरिकांनी सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करावा
नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. तसेच आपली वैयक्तिक माहिती जसे की एटीएम कार्ड नंबर, पिन कोणालाही सांगू नये. त्यामुळे सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करावे.
-धीरज बांडे, ठाणेदार

बातम्या आणखी आहेत...