आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 सप्टेंबरला विशेष मोहीम राबवणार:एक दिवस ई-पीक पाहणीसाठी; खामगाव तहसीलचा उपक्रम

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सर्व गावांमध्ये तहसिल विभागाच्या वतीने “एक दिवस ई-पीक पाहणीसाठी” हा उपक्रम १३ सप्टेंबर रोजी एकदिवसीय विशेष मोहीम म्हणुन राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आपल्या शेतातील पीक पेरा आपण स्वतः ई-पीक पाहणी या मोबाइल ॲप द्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मागील खरीप व रब्बी हंगामामध्ये तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ई-पीक पाहणी स्वतः नोंदवली आहे.

यावर्षी खरीप हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये जे पीक पेरले आहे. त्याची पिक पाहणी ही ई-पिक पाहणी मोबाईल ॲप द्वारे नोंदवावी व आपला सातबारा वरील पेरा अद्ययावत करावा. आपल्या सातबारा वरील पीक पेरा अद्ययावत असणे हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी १३ सप्टेंबर रोजी एकदिवसीय विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी प्रत्येक गावामध्ये कोतवाल, तलाठी हे उपस्थित राहून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी मार्गदर्शन करतील. तसेच मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तालुक्यातील गावांना भेटी देणार आहेत.

गावातील सरपंच, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,स्वस्त धान्य दुकानदार,तंटामुक्ती अध्यक्ष,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका या सर्वांनी एक दिवसीय ई-पीक पाहणी मोहिमेमध्ये सहभाग घेत गावातील खरीप पीक पेऱ्याची १०० टक्के ई-पिक पाहणीची अॅप मध्ये नोंद होईल, याकरता प्रयत्न करावेत असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...