आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात वृत्त:पुलाच्या कठड्याला कार धडकून एक ठार; एक जखमी ; पाडळी येथील घटना

पाडळी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार पुलाच्या कठड्याला धडकून पुलाखाली कोसळली. या अपघातात एक महिला ठार झाली असून तिचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना आज १८ जून रोजी सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास येथील पॉवर हाऊस जवळ घडली.

बुलडाणा येथील रहिवासी चंद्रकला प्रल्हाद देशमुख वय ६५ व त्यांचा मुलगा नीलेश प्रल्हाद देशमुख वय ४० हे एम.एच. २२/ए एम/ ३५५१ या क्रमांकाच्या कारने नाशिक वरुन बुलडाण्याकडे जात होते. यावेळी मुलगा नीलेश हा कार चालवित होता. पॉवर हाऊस जवळ येताच त्यांचे नियंत्रण सुटल्यामुळे कार पुलाच्या कठड्याला धडकून पुलाखाली कोसळली. या अपघातात चंद्रकला देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा नीलेश हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा समोरील भाग चक्काचूर झाला होता. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी नीलेशला बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...