आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:राज्यात एक लाख बिगर आदिवासी करताहेत आदिवासींच्या नोकऱ्या; एकलव्य संघटनेचा आरोप

बुलडाणा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी विकास विभागाच्या विविध विकास योजना समाजापर्यंत पोहोचल्याच नाहीत. जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात बोगस आदिवासी शासनाची दिशाभूल करुन आदिवासींच्या हक्काचा निधी लाटत असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसरीकडे राज्यात आदिवासीच्या नावावर एक लाख लोक शासकीय सेवेत आहेत. आदिवासींच्या अशा अनेक समस्या घेऊन आगामी काळात नाशिक येथील आदिवासी विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती एकलव्य संघटनेचे संस्थापक पवनराजे सोनवणे यांनी सांगितले.

पत्रकार भवन, बुलडाणा येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सुधारक वाघ, संदीप पिंपळे, माजी नगरसेवक गुलाब ठाकरे यांची उपस्थिती होती. ते म्हणाले की, आमच्यासह एकलव्य संघटना सध्या राज्यभर दौरे करत आहे. या दौऱ्यात शहाजी माळी, मधुकर पवार, सुनील गांगुर्डे, महिला आघाडीच्या रत्ना मोरे, विक्की गायकवाड हे सहभागी झाले आहेत. ११ जून रोजी डोंगरखंडाळा, शिरपुर, माळेगाव, राहेरा या गावांमध्ये शाखा उघडण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भिल आदिवासी समाज आहे. आदिवासी बांधवांकडे आधार कार्ड नाही, मतदार यादीमध्ये नाव नाही. राहती जागा नावावर नाही त्यांनी काढलेले जमिनीचे दावे फेटाळून लावण्यात येतात. त मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न बिकट झाला आहे. भिल समाज पारंपारिक व्यवसाय मासेमारी असून आज त्याला हा व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. असेही संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...