आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावकऱ्यांचीही मिळते साथ:जिल्हा परिषदेची शाळा मॉडेल करण्यासाठी मुख्याध्यापकांनी दिला एक महिन्याचा पगार

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतर खासगी शाळांप्रमाणे आणि इंग्रजी शाळांप्रमाणेच आपलीही शाळा मॉडेल व्हावी असे अनेक शिक्षक, कर्मचाऱ्यांना वाटते शिकायला येणारा प्रत्येक विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे नावलौकिक करून जीवनात यशस्वी व्हावा यासाठी शिक्षक धडपडत असतो. त्यासाठी स्वतः पासून सुरुवात केली तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. अशी सुरूवात तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा हिंगणा कारेगावचे मुख्याध्यापक राजेश कोगदे यांनी केली. कोगदे गुरुजींनी शाळेसाठी एक महिन्याचा पगार दिला तर गावकऱ्यांचीही या विकासात्मक कार्याला साथ मिळत आहे.

जिल्हा परिषद शाळेचा कायापालट स्वतःपासून सुरू करण्याचा निर्धार केला तो जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा हिंगणा कारेगाव शाळेचे मुख्याध्यापक राजेश वासुदेव कोगदे यांनी कोगदे गुरुजींनी शाळा मॉडेल करण्यासाठी सर्वप्रथम शाळेची रंगरंगोटी करण्याची ठरवले यासाठी त्यांनी आपला एक महिन्याचा पगार शाळेसाठी खर्च केला आणि त्यांच्या आवाहनाला गावकऱ्यांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला.यामध्ये ग्रीनशेड, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आसन,जेवणासाठी प्लेट्स, साऊंड सिस्टिम,पोडियम, कार्यालय सजावट अशा वस्तूंचा समावेश आहे. यासाठी गावातील माणिकराव जाधव, उमरावसिंग चव्हाण, शेषराव चव्हाण, शिवाजीराव चव्हाण, संघपाल जाधव, प्रमोद जाधव, गौतम जाधव, संदीप जाधव, विद्याताई जाधव, प्रा.प्रमोद चव्हाण, गोपाल पानझाडे, न्यू समता कबड्डी संघ, संजय दहिभात, सुभाषसिंग चव्हाण , जानराव जाधव यांनी मोलाची मदत केली. तर न्यू समता कबड्डी संघाच्या संपूर्ण टीमने दोन दिवस श्रमदान दिले. यामुळे विद्यार्थ्याच्या भौतिक सुविधा वाढण्यास मदत होत आहे.

बातम्या आणखी आहेत...