आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिखली हॉटेलमध्ये जेवण करुन घराकडे परत निघालेल्या एकावर काळाने घाला घातला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. रस्त्याच्या दुभाजकावरील पथदिव्याच्या खांबावर दुचाकी धडकून गुरुवारी (दि. ५) रात्री एकच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
गुरुवारी रात्री मेहकर फाट्यावरील हॉटेल हरदेवमध्ये जेवण करुन रवी अशोकराव तेजनकर (४३) व सिद्धेश्वर परमेश्वर शेवाळे (२९) हे दोघे दुचाकीने (एमएच २१ बीडब्ल्यू ८७१६) चिखलीकडे परत निघाले हाेते.
रात्री एकच्या सुमारास शहरातील अशोका लॉजिंगसमोरील दुभाजकावरील पथदिव्याच्या खांबावर दुचाकी जोरात धडकली. या अपघातात रवी तेजनकर हे जागीच ठार झाले़ तर सिद्धेश्वर शेवाळे हे गंभीर जखमी झाले़ त्यांचे दोन्ही पाय व हात फॅक्चर झाले आहे. एका खासगी दवाखान्यासमोर पॅथॉलॉजी लॅब चालविणारे मृत रवी अशोकराव तेजनकर यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.