आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवड:एक पाऊल स्वास्थ्यासाठी, एक झाड पर्यावरणासाठी; ओलांडेश्वर वृक्ष संवर्धन समितीचा उपक्रम

डोणगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या प्रत्येकजण स्वास्थाप्रति जागृत झाला असून प्रत्येकाला आपले स्वास्थ सुदृढ राहावे, असे वाटते. त्यामुळे धकाधकीच्या व्यस्त कामात सुद्धा सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले. परंतु सगळीकडे झाडाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे झाडांचे प्रमाण वाढीस लागून निसर्गरम्य वातावरणात फिरता यावे, तसेच गोरगरिबांना फळे मिळावी, या उद्देशाने येथील ओलांडेश्वर वृक्ष संवर्धन समितीने वृक्ष लागवडीस सुरवात केली आहे.

ओलांडेश्वर वृक्ष संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी ओलांडेश्वर मंदिर ते आरेगाव माळ या रस्त्याच्या दुतर्फा फळ झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे ही झाडे जगविण्यासाठी त्याला ट्री गार्ड लावण्यात येणार आहे. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात झाडाला पाणी देता यावे, यासाठी पंधराशे लिटरची टाकी व लोडिंग ॲपेचा बंदोबस्त केला आहे. दररोज दोन झाडे लावण्याचा संकल्प केला असून दोन वर्षात दीड हजारांहून अधिक झाडे लावून त्याचे संगोपन करण्यात येणार आहे.

वृक्ष संवर्धनासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा वाटा
वृक्ष संवर्धन उपक्रमाची माहिती मिळताच अप्पर जिल्हा अधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी दहा हजाराची मदत दिली आहे. तसेच उपक्रमास मदत लागेल त्याची माहिती कळवा, मी वृक्ष संवर्धनाच्या कामात खारीचा वाटा उचलण्यास सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

वृक्ष संवर्धनासाठी सरसावले गावकरी
ओलांडेश्वर वृक्ष संवर्धन समितीने ८ सप्टेंबर पासून वृक्ष लागवड करण्यास सुरवात केली. या वेळी गावातील राजकीय, सामाजिक, व्यापारी यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या वृक्ष संवर्धनाच्या कामाला गावकरी आपल्या परीने मदत करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...