आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकात्मिक प्रणाली:पहिलीसाठी मिळणार एकच पुस्तक; चिखली, देऊळगाव राजात होणार दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात वीस आदर्श शाळेत एकात्मिक प्रणाली अंतर्गत आधीच एकच पुस्तकाची संकल्पना राबवले जात आहे. मात्र आता जिल्ह्यातील चिखली व देऊळगाव राजा तालुक्यातील वर्ग एक ते सात पर्यंतच्या शाळांमध्ये हा प्रयोग या वर्षी नव्याने प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

या एकाच पुस्तकात सर्व विषय समाविष्ट असणार आहे. दिवाळी आधी एक व दिवाळीनंतर दुसरे पुस्तक राहणार आहे. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. पहिलीला फक्त एकच सृजन बालभारती नावाने पुस्तक जिल्ह्यात दिले जाणार आहे. त्यामुळे पहिलीचे ओझे आताच कमी करण्यात येत आहे. जिल्ह्यात शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी सव्वीस लाख विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या संचाचे वाटप होणार आहे.

दोन वर्ष कोविडचे गेल्यानंतर यंदाचे शैक्षणिक वर्ष चांगले जाण्याची शक्यता आहे. सध्या मराठी माध्यमाचे पहिलीचे २४ हजार २३९, दुसरीचे २२१५९, तिसरीचे २४२३९, चौथीचे २४०४४, पाचवीचे २८००८, सहावीचे २९११९, सातवीचे ३१८१०, आठवीचे ३२८४६ असे एकूण दोन लाख १६ हजार ४६४ विद्यार्थी आहेत. उर्दू माध्यमामध्ये वर्ग एक पहिलीचे ५२०५, दुसरीचे ५०४२, तिसरीचे ५१५७, चौथीचे ५०३२, पाचवीचे ५२१३, सहावीचे ५४८६, सातवीचे ५८९५, आठवीचे ५७०५ असे एकुण ४२७३५ विद्यार्थी आहेत. हिंदी माध्यमांची पहिलीत १६, दुसरीत ११, तिसरीत २७, चौथीत १९, पाचवीत ८५, सहावीत ७८ सातवीत ७८, आठवीत ८९ असे एकूण ४०३ विद्यार्थी आहेत. इंग्रजी माध्यमाची पहिलीत ९८, दुसरीत ७८, तिसरीत ९८, चौथीत ६७, पाचवीत ९१, सहावीत ६७, सातवीत ७७, आठवीत ६७ असे एकुण ६४३ विद्यार्थी आहेत. तिन्ही माध्यमांचे मिळून पहिलीत २९५५८, दुसरीत २७२९०, तिसरीत २९५२१, चौथीत २९१६२, पाचवीत ३३३९७, सहावीत ३४७५०, सातवीत ३७८६० व आठवीत ३८७०७ विद्यार्थी आहेत.

देऊळगाव राजा व चिखलीतील विद्यार्थी : चिखली व देऊळगाव राजा येथे एकात्मिक प्रणाली योजना प्रायोगिक तत्वावर राबवले जात आहे. चिखली तालुक्यात एकुण २९८२६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी पाचवी पर्यंतचे १२४४४ विद्यार्थी आहेत. देऊळगाव राजा तालुक्यात १४०६६ विद्यार्थी आहेत. यापैकी पाचवीचे ६४११ विद्यार्थी आहेत.