आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचे संरक्षण अधिनियम:कौटुंबिक हिंसाचारात समुपदेशनाने तडजोडीचे प्रमाण केवळ दहा टक्के

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे वाढले असून समुपदेशनातून गेल्या दहा महिन्यात फक्त दहा टक्के प्रकरणे निकाली निघाली आहेत. ही टक्केवारी कमी असल्याने महिला असुरक्षितच असल्याचे जिल्ह्याचे चित्र आहे. एकीकडे कुटुंबातील हिसाराचाला महिला बळी पडत असतांना मुलींच्या विनयभंगाचे प्रकारही घडत आहेत. बलात्काराचे प्रकारही मोताळा, संग्रामपूर भागात सातत्याने घडत आहेत.

स्त्री- पुरुष समानतेची शिकवण देणाऱ्या ताराबाई शिंदे यांचा जन्म या जिल्ह्यात झाला असून विविध चळवळीही येथे स्त्रियांसाठी राबवण्यात आल्या आहेत. महिला सबलीकरण करण्यासाठी येथे बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम केले जात आहे. नोकरदार वर्गातही महिलांचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे जिल्ह्यात अशी चांगली परिस्थिती महिलांसाठी असताना दुसरीकडे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणेही डोक वर काढत आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये प्रामुख्याने हिंसाचारात वाढ झाली आहे. त्यानंतर ही प्रकरणे बाहेर पडू लागली आहेत. मोबाईलही कौटुंबिक हिंसाचाराचा भाग बनला आहे. कोणाचा फोन आहे, तू कोणाला फोन केलास, त्यांचा फोन कसा आला.

३५७२ तामील नोटिसा; िनकालाची उत्सुकता कौटुबिक हिंसाचार प्रकरणात एकही प्रकरणात आधारगृहामध्ये दाखल झाल्याचे नाही. अपील, शिक्षा असेही प्रकार नाहीत. मात्र ३५७२ प्रकरणात नोटिसी तामील करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही संख्या मोठी असून या प्रकरणांचा निकाल काय लागतो. याकडेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.]

समेट होऊन प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण घटले कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये तडजोडी होण्याचे प्रमाण गेल्या दोन- तीन वर्षात निश्चितच कमी झाले आहे. ही प्रकरणे समुपदेशन केंद्रातील समुपदेशकमार्फत हाताळली जातात. सद्यस्थितीत याची कारणे शोधली असता असे दिसून येते की मुली शिक्षण घेत आहेत. त्या स्वयंभू झाल्या आहेत. पूर्वी प्रमाणे स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीत बदल होणे अपेक्षित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा अट्टाहास, शिक्षित स्त्रीची अपेक्षा या द्वंद्वात विभक्त होण्याचा निर्णय घेण्याचे पाऊल बहुतांश स्त्रियांकडून उचलले जात आहे. विवाह विच्छेदनला मुलीच्या कुटुंबाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात समर्थन असल्याचे दिसून येते. त्याला फारसे चुकीचे समजले जात नाही. स्त्रिया संसारात कोणतीही तडजोड करायला तयार नाहीत. कुटुंबापासून वेगळे राहण्याची मागणी बऱ्याच केसेसमध्ये आढळते. आताशा पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आक्रमक झाल्याचे दिसते. हे मुख्य कारण आहे. इतर कारणांमध्ये पुरुषांची व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध इत्यादींमुळे तडजोड होत नाही. म्हणूनच कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये समेट होवून प्रकरणे निकाली निघण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे, असे स्त्री मुक्ती संघटनेच्या शाहिना पठाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...