आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:रस्तेकामासाठी सत्ताधारी आमदारांचाच रास्तारोको

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या मोताळा ते नांदुरा मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शिंदे गटाचे सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात रविवारी आठवडे बाजार चौकात रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनामुळे तात्पुरत्या स्वरूपाच्या डांबरीकरणाच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली. काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

तीन वर्षांपूर्वी मोताळा ते नांदुरा मार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. या कामाचे कार्यारंभ आदेश सुद्धा झालेले आहे. परंतु बऱ्याच दिवसांपासून या मार्गाचे काम बंद पडलेले आहे. तर आठवडे बाजार ते बस स्थानक या मार्गावर दोन्ही बाजूने नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असल्याने या मार्गाला लागून असलेल्या लोकवस्तीमध्ये जाण्यासाठी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

परंतु संबंधितांनी मागणीची कोणत्याही दखल घेतली नाही. त्यामुळे या मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आ. गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सहाय्यक अभियंता एस. एन. तायडे यांनी लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...