आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षम्य दुर्लक्ष:‘अर्थपूर्ण’ हितसंबंधांतून मेहकर शहरात खुलेआम अवैध धंदे जोमात?; ऑनलाइन चक्रीमुळे अनेकांचे घरे उद्ध्वस्त, कारवाई करणे गरजेचे

मेहकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून शहर परिसरामध्ये खुलेआम अवैध धंदे सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलिस स्टेशन व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच मटका जुगार जोमात सुरू असताना सुध्दा त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे न वरिष्ठांनी या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

नगर परिषदेने व्यावसायिकांसाठी १७६ गाळे काढले आहे. मात्र, यातील काही गाळे हे व्यावसायिकांची उपजीविका भागवत आहे. परंतु भाजीपाला मार्केट परिसरातील आतील दुकानामध्ये व संतोषी माता नगरकडे जाताना वरली मटक्याचे अड्डे बनवले आहे. अनेकवेळा या ठिकाणी येणारे दारुडे हे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. पोलिस कारवाईच करत नसल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे.

अवैध धंदेवाल्यांचे मनोबल एवढे उंचावलेले आहे की, मेहकरच्या प्रत्येक चौकाचौकांमध्ये वरली मटक्याच्या चिठ्ठ्या फाडणारे व ऑनलाइन चक्रीची खुलेआम दुकाने थाटली आहे. त्यात भाजीपाला मार्केट, मध्यवर्ती बस स्थानक, मिरची मार्केट, प्रताप टॉकीजचा परिसर,गांधी कॉम्प्लेक्सच्या परिसरातील दुकानांमध्ये सुद्धा वरलीमटकाच्या चिठ्ठ्या राजरोसपणे फाडली जाता आहेत. तसेच ऑनलाइन चक्री च्या माध्यमातून उघड्यावर बसून अवैध व्यवसाय जोमात सुरू आहे. या संपूर्ण प्रकाराला ना कुणाचा धाक ना कुणाची भीती उरली असल्याने मोठे धाडस अवैध व्यावसायीक करत आहे.

बातम्या आणखी आहेत...