आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी डेटा:सदोष पद्धतीने ओबीसींचा डेटा गोळा करण्यास विरोध ; ओबीसी समाजाच्या  वतीने तीव्र आंदोलन

खामगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी समाज व महाराष्ट्र माळी कर्मचारी महासंघ तसेच विविध ओबीसी संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांना ओबीसींच्या सदोष पद्धतीने इम्पीरियल डेटा गोळा करण्यास विरोध करण्यासाठी १७ जून रोजी निवेदन देण्यात आले.

उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्या नुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांचे अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. या आयोगाने सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पीरिकल डाटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती.

परंतु आयोग वरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअर द्वारे आड नावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे. ही ओबीसी समाजाची फसवणूक आहे. सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील यांचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. तरी आयोगा द्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबवुन बी एल ओ, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून ती शासना मार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावी, अन्यथा ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माळी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र वानखडे, योगेश हजारे, सुनील पारखेडे, संतोष निलखन, जयेश वावगे, डॉ. श्याम देवकर, मनोज सुळोकार, गणेश राऊत, सुरेश राऊत, श्रीधर बोदडे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...