आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही महिन्यापासून तालुक्यात खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेती व्यवसाय जोरात सुरू होते. अवैध रेती संदर्भात अनेक तक्रारी होत्या, मात्र कोणतीच कारवाई होताना दिसत नव्हती. परंतु रेती माफिया विरोधात महसूल विभाग ॲक्शन मोडवर आला आणि अवैध रेती माफियांविरोधात धडक मोहीम राबवत ५ बोट, २ पोकलेन, २ टिपर व ५४० ब्रास रेती साठ्यावर कारवाई करून १ कोटी ३६ लाख दंडाचे आदेश पारित केले.
देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस बु. येथे खडकपूर्णा नदी पात्रातील अवैध रेतीचा व्यवसाय सुरू होता. दरम्यान १२ डिसेंबरला उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. भूषण अहिरे, तहसीलदार श्याम धनमने यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार व तलाठी यांनी अवैध रेती माफियांवर धडक कारवाई केली. यात ज्ञानेश्वर वाघ गट नं ३८१- १०० ब्रास अवैध रेती दंड १५ लाख ६० हजार, १ बोट दंड ५ लाख, २ टिपर दंड ४ लाख, मंदाकिनी अरविंद पऱ्हाड गट नं. ४४० - ८० ब्रास अवैध रेती दंड १२ लाख ४८ हजार, ओम पऱ्हाड यांची बोट दंड ५ लाख, मनेश वाघ गट नं.७५-१२० ब्रास अवैध रेती दंड १८ लाख ७२ हजार, १ बोट दंड ५ लाख, संजय शंकर पऱ्हाड गट नं ८१ - १४० ब्रास अवैध वाळू दंड २१ लाख ८४ हजार रुपये, भरत संजय पऱ्हाड यांची १ बोट दंड ५ लाख, १ पोकलेन, दंड ७.५ लाख, भास्कर महादेव लाड गट नं ४४७ - १५० ब्रास अवैध रेती दंड २३ लाख ४० हजार रुपये, रवी लाड यांची १ बोट दंड ५ लाख, १ पोकलेन, दंड ७.५ लाख, एकूण ५ बोटी २ पोकलेड २ टिपर व ५४० ब्रास अवैध रेती साठ्यावर कारवाई करून एकूण १ कोटी ३६ लाख रुपये दंडाचे आदेश पारित केले. या कारवाईत नायब तहसीलदार विकास राणे, ज्ञानेश्वर दांडगे, आर. एम. मांटे, मदन जारवाल, संजय हांडे, संदीप वायाळ, नीलेश जाधव, मधुकर उदार, संजय बरांडे, विनोद डोईफोडे यांचा सहभाग होता.
देऊळगावराजा येथे अवैध रेतीविरुद्ध धडक मोहीम राबवताना उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे व अन्य कर्मचारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.