आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

बुलडाणा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंभोडा येथील सहाय्यक भूवैज्ञानिक विजय श्रीराम जवंजाळ यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी येथे ११ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत आयोजित केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. संजय कुटे, आ.श्वेता महाले, आ.आकाश फुंडकर, आ.डॉ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, आ.राजेश एकडे, जगदेवराव बाहेकर, जि.प. सदस्या जयश्री शेळके, यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत पाटील, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, डॉ. गजानन व्यवहारे, डॉ. मधुकर देवकर, डॉ. अनिता रिंढे, विजय चोपडे, डॉ. शोण चिंचोले, डॉ. निखिल खरात, डॉ.योगेश गोडे, डॉ. कुणाल शेवाळे, डॉ गजेंद्र निकम, डॉ. शरद काळे, डॉ. विवेक जाधव, डॉ. राहूल बाहेकर हे उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील जवंजाळ व गावकऱ्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...