आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा वार्षिक‎ योजना:कौशल्य विकास‎ प्रशिक्षणाचे वाशीम‎ शहरात आयोजन‎

वाशीम15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारंपरिक शिक्षणाशिवाय‎ प्रशिक्षण घेवून रोजगार/‎ स्वयंरोजगार मिळवणे ही काळाजी‎ गरज आहे. याच आधारे केंद्र तसेच‎ राज्य शासनस्तरावरुन विविध‎ कौशल्य विकास योजना राबविण्यात‎ येत आहे.‎ याच धर्तीवर वाशीम जिल्ह्यात‎ २०२२-२३ मध्ये जिल्हा वार्षिक‎ योजनाच्या (सर्वसाधारण)‎ माध्यमातून किमान कौशल्य विकास‎ कार्यक्रम तसेच प्रमोद महाजन‎ कौशल्य व उद्योजकता अभियान‎ अंतर्गत जिल्हयातील १५ ते ४५‎ वयोगटातील रोजगार/स्वयंरोजगार‎ इच्छूक उमेदवारांना निःशुल्क‎ कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची‎ संधी उपलब्ध होत आहे.

निःशुल्क‎ प्रशिक्षण घेण्याकरता उपलब्ध‎ कोर्सेस पुढीलप्रमाणे : जिल्ह्यात‎ कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी‎ असिस्टंट ईलेक्ट्रीशियन,‎ ऑटोमोटिव्ह वेल्डिंग मशिन‎ असिस्टंट, मल्टीस्कील‎ टेक्नीशियन, मेडीकल सेल्स‎ रिफ्रेंझेंटेटिव्ह, फ्रेश वाटर‎ अक्वॉकल्चर फार्मर, मशरूम‎ ग्रोवर, ऑरगॅनिक ग्रोवर आदी‎ कोर्सेस उपलब्ध आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...