आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन‎:निराधार बालकांसाठी म‎होत्सवाचे आयोजन‎

बुलडाणा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा महिला व बालविकास‎ अधिकारी कार्यालयाच्या शासकीय‎ मुलाचे बालगृह, निरीक्षणगृह संस्थांमध्ये‎ पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ,‎ निराधार मुलांचा चाचा नेहरू बाल‎ महोत्सव आयोजित करण्यात आला‎ आहे. हा महोत्सव गुरूवार, २२ डिसेंबर‎ पर्यंत सुरू राहणार आहे.‎ अनाथ, निराधार, उन्मार्गी‎ मुलांमधील सुप्त गुणांना वाव‎ देण्यासाठी, तसेच त्यांच्यात‎ एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक‎ भावना निर्माण होण्यासाठी बालकल्याण‎ क्षेत्रात कार्यरत संस्थांमधील मुले व‎ शहरातील विविध शाळांमधील‎ मुलांसाठी जिल्हा महिला व बाल‎ विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने‎ शासकीय मुलाचे बालगृह, निरीक्षणगृह‎ शरद कला महाविद्यालयाच्या प्रांगणात‎ २० ते २२ डिसेंबर दरम्यान बाल महोत्सव‎ होणार आहे.‎

या प्रसंगी जिल्हाधिकारी‎ डॉ.एच.पी.तुम्मोड, जिल्हा सत्र‎ न्यायाधीश स्वप्निल खट्टी यांच्या हस्ते‎ महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. जिल्हा‎ महिला व बाल विकास अधिकारी‎ अशोक मारवाडी यांनी महोत्सवातील‎ क्रीडा, सांस्कृतिक, गीत गायन,‎ चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार‎ असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी‎ डॉ.तुम्मोड यांनी बालकांनी आपल्या‎ सुप्त गुणांना वाव देऊन प्रगती करावी,‎ असे मत व्यक्त केले. खट्टी यांनी‎ बालकांनी विविध स्पर्धेच्या युगात उत्तुंग‎ भरारी घेऊन आपले अस्तित्व सिद्ध‎ करावे असे सांगितले. या बाल‎ महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा,‎ असे आवाहन जिल्हा महिला व बाल‎ विकास अधिकारी अशोक मारवाडी‎ यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...