आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मोत्सव सोहळा:जिजाऊ सृष्टीवर भव्य जन्मोत्सवाचे आयोजन‎

सिंदखेडराजा‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचा‎ ४२५ वा जन्मोत्सव सोहळा यावर्षी‎ भव्य स्वरुपात साजरा होणार आहे. दि.‎ १२ जानेवारी रोजी जिजाऊ सृष्टी येथे‎ विविध कार्यक्रमांचे आयोजन‎ करण्यात आले आहे.

या सोहळ्याला‎ महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त‎ उपस्थित राहतील, अशी माहिती‎ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजन‎ समितीचे समन्वयक सुभाष कोल्हे‎ यांनी आज, दि. ६ जानेवारी रोजी येथे‎ पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार‎ परिषदेला मराठा सेवा संघाचे‎ तालुकाध्यक्ष अॅड. राजेंद्र ठोसरे आणि‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा‎ ज्योती जाधव यांची उपस्थिती होती.‎ दि. १२ जानेवारी रोजी सकाळी‎ सुर्योदयासमयी राजवाड्यात‎ जिजाऊंची महापूजा होणार आहे.‎ त्यानंतर जिजाऊ सृष्टी येथे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम‎ होणार आहेत.

मागील दोन वर्षे कोरोना‎ काळामुळे जिजाऊ जन्मोत्सव‎ सोहळा भव्य स्वरुपात झाला नाही.‎ परंतु, यावर्षी हा सोहळा भव्य स्वरुपात‎ आयोजित करण्यात आला असल्याचे‎ कोल्हे यांनी सांगितले. दि. १० आणि ११‎ जानेवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र‎ शासनाच्या सांस्कृतिक कार्य‎ मंत्रालयाच्या वतीने जिजाऊ गाथा हा‎ कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मराठा‎ सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी‎ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सांस्कृतिक‎ कार्यक्रमाचे बक्षीस वितरण होणार‎ आहे. दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९‎ ते दुपारी ४ या वेळेत नामदेव तुकाराम‎ वारकरी परिषदेच्या वतीने आयोजित‎ किर्तन महोत्सव, त्याच दिवशी‎ सायंकाळी जिजाऊ जन्मस्थळ‎ राजवाड्यात दीपोत्सव आणि‎ साडेपाच वाजता महिलांची मशाल‎ यात्रा निघेल .

बातम्या आणखी आहेत...