आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रशुद्ध‎ प्रशिक्षण:महिलांसाठी नि:शुल्क‎ योग शिबिराचे आयोजन‎

खामगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

योग विद्या गुरुकुल, नाशिक शाखा‎ खामगाव व पंचशील होमियोपॅथीक‎ मेडीकल कॉलेजच्या वतीने १ ते ७‎ मार्च पर्यंत दररोज सकाळी पावणे‎ सहा ते सात वाजेपर्यंत येथील‎ होमिओपॅथी वैद्यकीय‎ महाविद्यालयात व पत्रकार भवन‎ येथे योग वर्गाचे आयोजन करण्यात‎ आले आहे.‎ या वर्गात योग संजीवन व‎ प्राणायाम याबाबत शास्त्रशुद्ध‎ प्रशिक्षण देण्यात येणार आहे.‎ त्यामध्ये हस्त संचलन, पद‎ संचलन, जानु संचलन,‎ प्राणायामाची पुर्व तयारी, ध्यान,‎ याबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात‎ येईल. योग शिक्षक शुभांगीताई‎ घीवे, संगीता खरासने व कीर्ती‎ देशमुख या योगशिक्षिका मार्गदर्शन‎ करणार आहेत. योग वर्गासाठी नांव‎ नोंदणी करणे आवश्यक आहे.‎ त्यामुळे इच्छुक नागरिकांनी नांव‎ नोंदणी करुन प्रवेश निश्चित‎ करावा. जास्तीत जास्त महिला‎ साधकांनी या योग वर्गाचा लाभ‎ घ्यावा, असे आवाहन योग‎ विद्याधाम नाशिक शाखा‎ खामगावच्या वतीने केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...