आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे जयंती उत्साह साजरे करण्यावर बंधने होती. आता मात्र सर्वच कार्यक्रमांना मोकळीक असल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. ३० मे रोजी देऊळगावमही येथे महिला कीर्तनकार हभप राधाताई भोलाने यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अखंड मानवजातीसह पशुपक्षी, जलचर-जीवजंतू यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करुन लोककल्याणकारी आदर्श असे राज्य निर्माण करुन धार्मिक सांस्कृतिक, आर्थिक, व्यावसायिक स्तर उंचावला. त्यांच्या जयंतीच्या निमित्त हभप राधाताई भोलाने पाटील यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून जीवन कार्यावर प्रकाश टाकणार आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जीवनसाथी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.