आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुध्द जयंती:बुध्द जयंतीनिमित्त बुलडाणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त १६ मे बुद्ध पौर्णिमेला एकदिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार १६ मे रोजी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सकाळी शहरातून शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बौध्द उपासक, उपासिका पांढरे वस्त्र परिधान करून या रॅलीत सहभागी होणार आहेत.

शांतता रॅलीत कोणतीही घोषणा बाजी अथवा नारे दिले जाणार नाहीत. ही शांतता रॅली गांधी भवन जयस्तंभ चौक येथून सुरू होऊन जुने शहर, पोलिस स्टेशन, आठवडी बाजार, जनता चौक, कारंजा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे गांधी भवन जयस्तंभ चौकात या रॅलीचे विसर्जन करण्यात येणार आहे. गांधी भवन येथे दीप प्रज्वलन व प्रार्थना होईल. त्यानंतर सायंकाळी साडे पाच वाजता जयस्तंभ चौक ते डॉ. आंबेडकरनगर येथील तीन पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. तर गांधी भवन येथे सायंकाळी साडे सहा वाजता बक्षिस वितरण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध गायिका सपना खरात यांचा बुद्ध व भीम गीतांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...