आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीचे तांडव:अंबाबरवा अभयारण्यातील मांगेरी, सालवण बीटमध्ये आगीचे तांडव; 90 हेक्टरमधील वनसंपदा जळून खाक, व्याघ्र क्षेत्र संचालकांची भेट

संग्रामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या अंबाबारवा अभयारण्यातील सोनाळा परिक्षेत्रातील दक्षिण मांगेरी व सालवन बीटमध्ये आग लागली. या आगीत नव्वद हेक्टर क्षेत्रातील मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाल्याचे वन विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच व्याघ्र क्षेत्र संचालकांनी पाहणी केली.

अंबाबरवा अभयारण्यातील सोनाळा वन परिक्षेत्रातील दक्षिण मांगेरी व सालवन बीटमध्ये ३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग ४ एप्रिल रोजी आटोक्यात आली. परंतु तोपर्यँत या आगीत ९० हेक्टर क्षेत्रातील वनसंपदा जळून खाक झाली होती. ही आग विझवण्यासाठी वन कर्मचारी व मजूर हे आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते.

विशेष म्हणजे आग कुठे लागली, हे ड्रोन कॅमेरा द्वारे तपासण्यात आले. सोमवारी मेळघाट व्याघ्र क्षेत्र संचालक ज्योती बॅनर यांनी अभयारण्यास भेट देऊन पाहणी केली. अशीच आग २८ फेब्रुवारी रोजी लागली होती. आग लावण्यामागे वणवा पेटला की, गोंद तस्कर व अवैध मार्गाने जंगलातून जनावरे नेणाऱ्यांनी आग लावली, याचा कसून तपास केला जात आहे. अकोटचे उपवनसंरक्षक कमलेश पाटील आणि सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे हे घटनास्थळी तळ ठोकून प्रत्यक्ष नियंत्रण करीत होते.

बातम्या आणखी आहेत...