आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक छायाचित्र दिन:आमच्या काळातील फोटोग्राफी आव्हानात्मक होती ; वसंतराव ढोले

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल कॅमेऱ्याच्या जमान्यात फोटोग्राफीची उत्सुकता कमी झाली आहे आधीच्या काळात फोटोग्राफी ही खूपच आव्हानात्मक व कष्टदायी होती ब्लॅक अँड व्हाईट फोटो तयार करण्याचे कसब हे सगळ्यांच्याच अंगी नव्हते त्या काळातली फोटोग्राफी ही आतापेक्षा आव्हानात्मक होती, अशी आठवण वसंतराव ढोले यांनी करुन दिली.१९ ऑगस्ट रोजी येथील केमिस्ट भवनात जागतिक छायाचित्र दिनानिमित्त बुलडाणा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष आत्माराम झाल्टे हे होते .याप्रसंगी व्यासपीठावर सचिव अजय कल्याणकर यांच्यासह विवेक ढोले, आप्पा जतकर, निनाजी भगत, नीलेश रत्नपारखी, विठोबा इंगळे,हेमंत चिखले दीपक पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उमेश शिंगणे,रवी थुट्टे,नारायण एंडोले, दिपक पाटील,रवी भोंडे,आप्पा जतकर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रविकिरण टाकळकर यांनी तर आभार अजय कल्याणकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी बुलडाणा फोटोग्राफर असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...