आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:शेगावातील 21 गावांत एक गाव, एक गणपती ; ग्रामीण भागात 13, तर जलंब 8 गणपती स्थापन

शेगाव / धनराज ससानेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या संकटानंतर या वर्षी मोठ्या प्रमाणात सण, उत्सव साजरे केले जात आहेत. कोरोनाच्या निर्बंधामुळे मोजक्या लोकांत सण, उत्सव साजरे केले जात होते. परंतु आता कुठलेही निर्बंध नसल्यामुळे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. तालुक्यातील २१ गावात एक गाव, एक गणपतीची स्थापना करून ग्रामस्थांनी गावाची ऐकता दाखवली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात १३, तर जलंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ गणपतीचा समावेश आहे.

ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण, तिंत्रव, जानोरी, गौलखेड, चिंचोली, लासुरा बु., सवर्णा, गायगाव बु., गायगाव खु., मनसगाव, गोळेगाव, भोणगाव, सांगवा या गावात एक गाव, एक गणपती तर जलंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत ब्राह्मणवाडा, माटरगाव खुर्द, लांजुड, भोटा, कुरखेड, खेर्डा, मच्छिंद्रखेड, तरोडा या गावकऱ्यांनी एकजूट दाखवत एक गाव, एक गणपतीची स्थापना केली आहे. तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५५ गणेश मंडळानी रितसर परवानगी घेऊन गणपतीची स्थापना केली आहे. सर्वच गणपती मंडळाने आपापल्यापरीने सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे.

मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा
गणेशोत्सव हा सर्वांनी आनंदात साजरा करून या उत्सवात समाजोपयोगी कार्यक्रम घेऊन समाजाला एक चांगला संदेश द्यावा. मिरवणूक दरम्यान पारंपरिक वाद्याचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- धीरज बांडे, ठाणेदार, जलंब.

नियम पाळून साजरा करावा गणेशोत्सव
ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३ गावात एक गाव, एक गणपतीची स्थापना करण्यात आली. पोलिस प्रशासन वेळोवेळी प्रत्येक गावातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळास मार्गदर्शन करत आहे. शासनाचे सर्व नियम पाळून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा.
राहुल जंजाळ, ठाणेदार, शेगाव ग्रामीण

बातम्या आणखी आहेत...