आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्र रंगवा स्पर्धा:सावता परिषद महिला आघाडीची‎ चित्र रंगवा स्पर्धा उत्साहात‎

मंगरूळपीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिज्योती सावित्रीबाई‎ फुले यांच्या जयंतीनिमित्त वाशीम‎ जिल्हा सावता परिषद महिला‎ आघाडीच्या वतीने येथील शाळा‎ क्रमांक २ मध्ये चित्र रंगवा स्पर्धा‎ आयोजित करण्यात आली. नगर‎ परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा ‎क्रमांक दोन येथे शाळेमध्ये विविध‎ उपक्रम करुन प्रत्येक विद्यार्थ्यांचा‎ सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने‎ स्पर्धेचे आयोजन केले जात असते.‎ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती‎ पर्वावर सावता परिषद महिला आघाडी‎ वाशीम जिल्ह्याच्या वतीने चित्र रंगवा‎ स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उपस्थित‎ मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या‎ जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या‎ जीवनकार्याला उजाळा दिला.‎ ‎ ‎

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी‎ नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश‎ शेवदा, सामाजिक कार्यकर्ते सावता‎ परिषदेचे पांडुरंग कोठाळे शिक्षण‎ विभागाचे सतीश गायकवाड महाराष्ट्र‎ मुख्याध्यापक किशोर खोडके तसेच‎ नगर परिषद प्राथमिक मराठी शाळेचे‎ सर्व शिक्षक वृंद कार्यक्रम यशस्वी‎ करण्यासाठी परिश्रम घेतले.‎ कार्यक्रमाचे संचालन किशोर खोडके‎ यांनी केले. जिल्हाध्यक्ष पांडुरंग‎ कोठाळे यांनी विचार प्रगट करत‎ प्रत्येक कार्यक्रमात सावित्रीबाईंच्या‎ पूजन झालंच पाहिजे आणि‎ सावित्रीबाई फुले यांची जयंती ही‎ सणासारखी साजरी केली पाहिजे हा‎ पायंडा प्रत्येकाने घ्यावा असे त्यांनी‎ सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...