आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:परशुराम जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा; चिखलीत निघाली शोभायात्रा

चिखली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समस्त ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत राजराजेश्वर भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव चिखली शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेचे ठिकठिकाणी उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

श्री परशुराम जयंतीनिमित्त पहाटे पाच वाजता श्री रेणुकादेवी मंदिरात भगवान परशुराम मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी नऊ वाजता ब्राह्मण समाज विकास बहुउद्देशीय संस्थेद्वारे बांधण्यात येणाऱ्या संकल्पित श्री परशुराम भवनाचे भूमिपूजन आमदार श्वेता महाले व पद्माकर दंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. सायंकाळी सहा वाजता आदर्श विद्यालय जवळील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला.

यावेळी महाआरती होऊन प्रसादाचे वितरण करण्यात आले. माजी आमदार राहुल बोंद्रे, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, ज्येष्ठ नेते रामदास देव्हडे, माजी नगराध्यक्षा विमल देव्हडे, नगरसेवक गोविंद देव्हडे, भाजप शहराध्यक्ष व श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, शैलेश अय्या, जाई वाणी समाजाचे अध्यक्ष गोपाल शेटे, माजी नगरसेवक सचिन बोंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशीनाथ बोंद्रे,कुणाल बोंद्रे, रामदेव इंडेनचे संचालक शैलेश बाहेती, दिनेश जायस्वाल, भाजप नेते सुरेशआप्पा खबुतरे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, दिलीप डागा आदींनी भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. चिखली अर्बन बँक, बालाजी अर्बन पतसंस्था, बसवेश्वर अर्बन पतसंस्था, शर्मा परिवार, जोशी परिवार, खंडेलवाल परिवार यांच्या वतीने शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. महाराष्ट्र ब्राह्मण सभा, खाण्डल विप्र संघटना, गौड ब्राह्मण संघटना, दधीच ब्राह्मण संघटना, पारिक ब्राह्मण संघटना, लाड ब्राह्मण परिषद आदी ब्राह्मण समाजातील महिला, पुरुष व युवक सहभागी झाले होते.

शोभायात्रचे चिखलीकरांकडून झाले उत्स्फूर्त स्वागत
शोभायात्रेचे चिखलीकरांनी ठिकठिकाणी उस्फुर्त स्वागत केले. शोभायात्रेच्या मार्गावर सडा रांगोळ्या काढून सुवासिनींनी भगवान परशुरामाच्या मूर्तीच्या औक्षण केले. ब्राह्मण युवा मंच व वक्रतुंड प्रतिष्ठान आणि श्री गणपती संस्थान तसेच श्री गणपती संस्थानतर्फे शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. जागोजागी आतषबाजी देखील करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...