आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असुविधा:पायाभूत सुविधांसाठी पालकांचा शाळेत ठिय्या ; लिखित अश्वासनानंतर आंदोलन मागे

डोणगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील फखरोद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज १९८३ पासून अस्तित्वात आले. या शाळेत एक हजारच्या जवळपास विद्यार्थी असूनही शाळेला इमारत नाही. त्यामुळे असुविधा असलेल्या शाळेत सुविधा व्हावी या मागणीसाठी पालकांनी १ ऑगष्ट रोजी शाळेला ठिय्या आंदोलन केले व वर्ग खोल्याचे पक्के बांधकामास सुरुवात होइल या लिखित अश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.

डोणगाव मध्ये उर्दू माध्यमाचे ५ ते १२ पर्यंत शिक्षणासाठी फखरोद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ही अनुदानित संस्था आहे. मात्र या शाळेवर मूलभूत सुविधा नाही. मागणी साठी दहा दिवस अगोदर पालकांनी मुख्याध्यापक यांना घेराव टाकत आपल्या मागण्या सांगितल्या होत्या. त्याच वेळेस शाळेतील भौतिक सुविधा मिळवण्यासाठी पालकांची व संस्था सदस्य व अध्यक्ष यांची १ ऑगस्ट रोजी बैठक घ्या, असे निवेदन दिले होते. असे असताना सुद्धा शाळेने कोणतीच सुविधा येथे केलेली नव्हती इतकेच नव्हेतर पालकांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली नव्हती. ज्यामुळे पालकांनी शाळेची इमारत कधी होणार हे लिहून द्या, असे सांगत ठिय्या मांडला या नंतर संस्थेकडून माजी सरपंच संजय आखाडे व ग्रा प सदस्य तथा संस्था चालक प्रतिनिधी या नात्याने चरण आखाडे यांनी २ ऑगस्ट पासून वर्ग खोल्याचे बांधकामास सुरुवात होणार हे लिखित स्वरूपात घेतले व ठिय्या आंदोलन दुपारी ३ वाजता स्थगित करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...