आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकेकाळी अभ्यासाची अविभाज्य घटक असलेली पाटी, लेखणी आता काळाच्या ओघात दुर सारली गेली आहे. त्या पाटीची जागा आता वही-पेन व डिजिटल माध्यमांनी घेतली आहे. पाटीमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरातील ओझे कमी झाले आहे. काळानुसार पाटीला सुटी मिळाली असली तरी कधी काळी होमवर्क मधला महत्वाचा दुवा होता. दगडी पाट्याला लाकडी फ्रेम असायची. शाळेत जातांना पहिल्याच दिवशी अक्षरे लिहण्याची सुरुवात पाटीवर व्हायची. इतकेच नव्हे तर मुहूर्तावर पाटी पूजनाची प्रथा वर्षानुवर्ष चालत आली. मात्र माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या जीवन व शिक्षणाची साधने बदलली आणि विद्यार्थ्याच्या दप्तरातील पाटी गायब झाली आहे. पाटी लेखनाची जागा आता वही आणी पेनाने घेतली आहे. पेनाने वहीत लिहलेले अक्षर दिर्घकाळ टिकून राहते. परंतु पाटीवर लेखणीच्या साह्याने लिहलेले अक्षर लगेच पुसले जाते. पुर्वी पाटीवर लिहायचे आणि ते पुसले जाऊ नये यासाठी घेतली जाण्याची काळजी घेण्याची पध्दत काही औरच होती. एवढेच नव्हे तर सायंकाळी शाळा सुटल्यावर होणारा आनंद गगनात मावेनासे असे. यात शाळा सुटली पाटी फुटली अशी आरोळी देऊन मित्रांच्या घोळक्यात उधळण्याचा विद्यार्थी दशेतील आनंद काही वेगळाच राहात होता. सध्या पाटील गेली असली तरी विद्यार्थ्याच्या पाठीवरचे ओझे मात्र कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढल्याचे दिसून येते. तरी त्या काळी शिक्षण व्यवस्थेला पाटीचे महत्व अनन्य साधारण होते. पाचवीलाच पुजली जायची पण आता जमाना बदलला असून आता पाट्या फक्त धान्य, कपडे दुकानाबाहेर भाव लिहिण्यासाठी उरल्या आहेत. पाटी आणि पेन्सिलनेच आयुष्य घडवले. अनेक ज्ञानी, गुणवान, तत्वज्ञानी व्यक्तींनी पाटीचा वापर केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.