आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलोखा:धामणगाव बढे येथे‎ शांतता समितीची बैठक‎

धामणगाव बढे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस स्टेशनचे आवारात‎ शांतता समितीची बैठक ठाणेदार‎ सुखदेव भोरकडे यांच्या‎ अध्यक्षतेखाली दि.५ एप्रिल रोजी‎ संध्याकाळी पार पडली‎ यावेळी पुढील येणारे सण‎ उत्सवाच्या अनुषंगाने गावात शांतता‎ सुव्यवस्था व जातीय सलोखा‎ कायम राहावा, यासाठी गावातील‎ प्रतिष्ठित नागरिक शांतता समिती‎ सदस्य पत्रकार बांधव उपस्थित होते.‎ यावेळी ठाणेदारांनी सांगितले की,‎ गावात शांतता जातीय सलोखा‎ कायम राहावा यासाठी पोलिस‎ प्रशासन आपले काम करतच आहे.‎ त्यासाठी गावातील शांतता समिती‎ सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक‎ यांची सुद्धा पोलिस प्रशासनाला साथ‎ मिळाली तर गावात कोणत्याही‎ अनुचित प्रकार घडू शकत नाही व‎ नागरिकांशिवाय शांतता अबाधित‎ ठेवणे शक्य नाही, असे सांगितले.‎

यावेळी भाजप नेते गजानन घोंगडे,‎ जामा मशीदचे इमाम हनीफ मिल्ली,‎ काँग्रेसचे रवीशंकर मोदे, काँग्रेस नेते‎ बिस्मिल्ला कुरेशी, काँग्रेस नेते गणेश‎ सिंग राजपूत, अलीम कुरेशी, भाजप‎ नेते कृष्णा भोरे यांनी आपले मनोगत‎ व्यक्त केले. यावेळी गावातील‎ प्रतिष्ठित नागरिक काँग्रेस नेते‎ धनराज घोंगडे, शिवसेना ठाकरे गट‎ राजू बोरसे, ग्रामपंचायत सदस्य‎ जमीर कुरेशी, लक्ष्मण गवई आदींची‎ उपस्थिती होती.‎