आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:किनगावराजात शांतता कमिटीची बैठक ; सण-उत्सवानिमित्त ठाणेदार युवराज रबडे यांच्या सूचना

किनगावराजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी गणपती व दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने किनगावराजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांनी नुकतीच स्थानिक पोलिस स्टेशनच्या प्रांगणात शांतता कमिटीची बैठक घेतली. यावेळी पोलिस स्टेशन हद्दीतील गणपती व दुर्गा मंडळाचे पदाधिकारी यांना गणपती व दुर्गा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.

बैठकीला शांतता कमिटी सदस्य, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ठाणेदार रबडे यांनी गणपती व दुर्गा उत्सव पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून या दोन्ही उत्सवात काही अनुचित प्रकार घडणार नाही. तसेच गणपती विसर्जन मिरवणूक ठरलेल्या वेळेच्या आतच पूर्ण करावी अशा सूचना दिल्या. तर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी बोलताना सांगितले की, गणपती व दुर्गा उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही उत्सवा दरम्यान आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम व विविध समाज उपयोगी संकल्पना राबवत हे उत्सव मोठ्या थाटात व शांततेत पार पाडावे, जेणेकरून समाजाला एक चांगला संदेश यानिमित्ताने जाईल असे सांगितले.

तर माजी सरपंच रमेश खरात यांनी विसर्जन मिरवणूक काढत असताना त्यासाठी लागणारे वाहन हे योग्य प्रकारे असले पाहिजे. त्याची पूर्ण कागदपत्रे आरटीओ नियमांप्रमाणे असली पाहिजे. यासह मिरवणुकीत कोणीही मद्य प्राशन करून सहभागी होणार नाही याची खबरदारी संबंधीत मंडळ व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व गावातील नागरिकांनी घेतली पाहिजे. जेणेकरून या उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व उत्सव शांततेत पार पडतील. बैठकीला शांतता कमिटी सदस्य, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, मंडळ पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...