आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता समितीची बैठक:मोताळ्यात शांतता समितीची बैठक; कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन

मोताळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळातील सण उत्सवानिमित्त २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने उपस्थितांना करण्यात आले.मलकापूर मार्गावरील सुप्रभात डेअरी येथे पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, तहसीलदार डॉ. सारिका भगत, बोराखेडी ठाणेदार पाटील, नगर पंचायतचे भोलाने, नगरसेवक, पत्रकार, पोलिस पाटील, गणेश मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मंडळींची उपस्थिती होती.

कार्यक्रमात आगामी गणेशोत्सवात कोणीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार भगत यांनी दिला. तसेच आगामी सण, उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडावे तसेच गणेश मंडळासमोर जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन जातीय सलोखा कायम ठेवण्याचा संदेश देणारे देखावे तयार करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी केले. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य कोणीही करू नये आगामी सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...