आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्ध महिलेचा मृत्यू‎

संग्रामपुर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने‎ समोर पायी चालणाऱ्या पासष्ट‎ वर्षीय वृद्ध महिलेस जबर धडक‎ दिली. या अपघातात महिला गंभीर‎ जखमी झाली. ही घटना २ फेब्रुवारी‎ सायंकाळी साडे सहा वाजेच्या‎ सुमारास पातुर्डा रोडवरील तिसऱ्या‎ मोरी जवळ घडली होती. दरम्यान,‎ आज ३ फेब्रुवारी रोजी सकाळी‎ दहा वाजता शेगाव येथील सईबाई‎ मोटे रुग्णालयात उपचार सुरू‎ असतानाच त्या‎महिलेचा मृत्यू‎झाला आहे.‎तालुक्यातील‎वानखेड येथील‎वृद्ध महिला‎ कलाबाई हरिभाऊ तायडे या शेगाव‎ येथे दवाखान्याच्या कामानिमित्त‎ गेल्या होत्या.

दवाखान्याचे काम‎ आटोपून त्या गावाकडे जाण्यासाठी‎ शेगाव-पातुर्डा बसमध्ये बसल्या.‎ परंतु पातुर्डा फाट्यावर उतरण्या‎ ऐवजी त्यांना बस पातुर्डा गावाकडे‎ जात असल्याचे समजताच‎ वाहकाला बस थांबवून त्या‎ रस्त्यात उतरुन पायी पातुर्डा‎ फाट्याकडे जात होत्या. एवढ्यात‎ पाठीमागून येणाऱ्या अज्ञात दुचाकी‎ चालकाने कलाबाई तायडे यांना‎ जबर धडक दिली.‎ या अपघातात महिला गंभीर‎ जखमी झाली होती.‎

घडताच अज्ञात दुचाकी‎ चालकाने घटनास्थळावरुन पळ‎ काढला. त्यानंतर अपघातात गंभीर‎ जखमी झालेल्या महिलेला खासगी‎ वाहनाने शेगाव येथील सईबाई मोटे‎ रुग्णालयात उपचारार्थ दाखल‎ केले. आज शुक्रवारी उपचारा‎ दरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला.‎ प्रकरणी मृत महिलेचे नातेवाइक‎ सुभाष तायडे रा. वानखेड यांनी‎ तामगाव पोलिसांत दिलेल्या‎ तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात‎ दुचाकी चालका विरुद्ध गुन्हा‎ दाखल केला आहे. पुढील तपास‎ ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पीएसआय‎ नितीनसिंह चव्हाण हे करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...