आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यास दंड

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वरवट खंडेराव या गावाजवळ अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना एक वाहन आढळून आले. यावेळी महसूल विभागाने वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये दोन ब्रास वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करत वाळू माफिया महसूल विभागावर पाळत ठेवून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात करत आहेत.

दरम्यान, महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्याआधीच वाळूची वाहतूक करणारे वाहने घेवून पसार होत होतात. त्यामुळे उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कवठळ महसूलचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी ५ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले.

बातम्या आणखी आहेत...